पांगरी (गणेश गोडसे) :- आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द, मेहनत व चिकाटी ही त्रिसुत्री महत्वाची असुन या त्रिसुत्रीचा वापर केल्यास जिवनात यश निश्चितच मिळते. तसेच समाजातील तळागाळातील विद्यार्थांनासुध्दा दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठीच आपण महाविदयालयाची स्थापना केली असल्याचे प्रतिपादन संजीवकुमार सोनवने यांनी केले. ते उक्कडगाव (ता. बार्शी) येथील डॉ.चंदभानु सोनवणे कनिष्ठ महाविदयालयाच्या प्रांगणात आयोजित पालक मेळावा व गुणवंत विदयार्थांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेच्या परंपरेनुसार गुणवंत विद्यार्थांचे पालक सर्जेराव बुरकुले, यशवंत गावडे, समुद्रे बप्पा, अशोक मैदाड, कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे सचिव मोरे यांनी संस्थेची ध्येय धोरणे व इतिहास याबदल विस्तृत विवेचन केले. प्रशालेचे प्राचार्य विशाल जमाले यांनी प्रशालेतील शिस्त नियम व त्याची अंमलबजावणीचा काटेकोरपना याबदल नुतन विदयार्थांना माहिती देऊन मोबाइलबंदी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात प्रशालेत व सीइटी टीइटी परिक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या कु.पुजा दत्तात्रय मस्के, राहुल संपतराव करडे, आकाश आनंदराव मडके, गोविंदराज मोहन माने आदी विदयार्थांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिस व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर विदयार्थी व पालकांनी मनोगते व्यक्त केली. पालक मेळाव्यासाठी राज्यभरातुन मोठया संख्येने पालकवर्ग उपस्थित होता. पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविदयालयाच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.विशाल गरड यांनी तर आभार प्रा.पियुश पाटील यांनी मानले.