पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी (ता. बार्शी) येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण व बुध्‍दविहार येथील अंतर्गत कॉक्रिटीकरण या दोन्ही कामाचे भुमिपुजन पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्‍यात आला.
    भुमीपुजनाप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती युवराज काटे, शितल जानराव, तात्यासाहेब खबाले, अरूण नारकर, माजी सरपंच दत्ता काकडे, नंदकुमार काशिद, वसंत गरड, मोहन घावटे, कल्याण सरडे, धनंजय तौर, सुनिल गाढवे, विक्रांत गरड, विलास गोडसे, बाबा जाधव, चिंचोलीचे तंटामुक्ती अध्यक्ष किरण पवार, घोळवे, सार्वजनिक बांधकाम विभाग बार्शीचे उपविभागीय अभियंता एस.बी.बळी, शाखा अभियंता एस ए.देसाई, स्थापत्य अभियंता सचिन वासकर आदी मान्यवर हजर होते.
     पालकमंत्री सोपल यांनी पुणे-लातुर राज्य मार्ग ते अयोध्यानगर भागाला जोडणा-या अंतर्गत रस्त्यासाठी दहा लाख रूपयांचा आमदार निधी मंजुर केला असुन बुध्‍दविहार येथील अंतर्गत क्रॉकिटीकरण काम दलित वस्ती सुधारणा योजनमधुन करण्‍यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यश्स्वीतेसाठी दत्ता पोफळे, निलेश तावसकर, संतोष चव्हाण, कल्याण सरडे, समाधान पोफळे, निलकंठ शेळके, आश्पाक शेख, कल्याण जाधव, बालाजी काळे, सुनिल गाढवे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
 
Top