बार्शी (मल्लिकाजू्रन धारुरकर) : नगराध्यक्षपदाच्या पाच पैकी अडीच वर्षांचा राखीव पदाचा कालावधी संपल्यानंतर खुल्या गटासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये मुदतीत राष्ट्रवादीचे नगरसेवक रमेश पाटील यांचा नगराध्यक्षपदी तर अरुणा परांजपे यांचा उपनगराध्यक्षपदी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा प्रशासन अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी केली.
बार्शी शहराच्या विस्तारीत, हद्दवाढ भागाचा विचार करता बार्शी शहर हे भगवंत मंदिरापर्यंत खालचा भाग आणि त्याच्या पाठीमागे वरचा भाग अशा दोन वेगवेगळ्या विभागांत दिसून येते. पहिल्या अडिच वर्षांसाठी खालच्या भागातून राखीवसाठी मुस्लिम समाजातील कादर तांबोळी यांना नगराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. याचवेळी वरच्या भागातून उपनगराध्यक्ष पदासाठी मराठा समाजातील तरुण नेतृत्व राहुल कोंढारे यांना संधी देण्यात आली. अडीच वर्षांचा कालावधी संपल्यावर नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या मंगल शेळवणे, बाबुराव जाधव, नाना मांगडे आणि रमेश पाटील यांची नावे चर्चेत होती. सोपल यांच्यावरील निष्ठा, समाजासाठी करण्यात येणारे काम व अनुभवाचा तसेच इतरांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार करुन क्रिडा शिक्षक असलेल्या रमेश पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी इच्छुक असलेल्या मंगल शेळवणे यांनी नाराजी व्यक्त करुन नाराजीनाट्य गाजवले परंतु त्याचा कसलाही परिणाम सोपल यांच्या गटावर झाला नाही. उपनगराध्यक्षपदासाठी ब्राह्मण समाजातील अरुणा परांजपे यांना उपनगराध्यक्षपदाची संधी देऊन सोपल यांनी त्यांच्या कार्याची पोचपावती दिली आहे.

.jpg)