उस्मानाबाद -: कारगिल (ऑपरेशन विजय) युध्दात मिळालेल्या विजयास दिनांक 26 जुलै 2014 रोजी पंधरा वर्षे पुर्ण होत असून यादिवशी शासकीय सुटटी असल्याने कारगिल दिन आता 28 जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. यादिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या दिवशी सकाळी 8 ते 9 वाजता शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, सकाळी 9-10 वा. जिल्हाधिकारी डॅा. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते नगर परिषद येथील स्मृतीस्तंभास अभिवादन केल्यानंतर कारगिल युध्दातील शहीद जवान शिरीषकुमार भिसे यांची विधवा पत्नी श्रीमती मीनाक्षी भिसे यांचा सत्कार नगर परिषद, उस्मानाबाद येथे करण्यात येणार आहे.
या दिवशी शहर व जिल्हा वासीयांनी आपापल्या घरांसमोर रांगोळ्या काढाव्यात, दीपप्रज्वलन करावे, घरांवर रोषणाई करावी व कारगिल विजय दिवस साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद यांनी केले आहे.