नळदुर्ग :- नळदुर्ग-तुळजापूर रस्‍त्‍यावरील नगरपालिकेच्‍या जलशुध्‍दीकरण केंद्राच्‍या प्रागंणात नळदुर्ग न.प. च्‍यावतीने सोमवार दि. 14 जुलै रोजी उपनगराध्‍यक्षा अपर्णा बेडगे, नगरसेविका मंगल सुरवसे यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात आले.
      सर्वत्र वृक्षारोपण पंधरवडा म्‍हणून साजरा केला जात आहे. सर्वत्र मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण करण्‍यात येत आहे. जिल्‍हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्‍ह्यातील सर्व नगरपालिकांना वृक्षारोपण करण्‍याचे आदेश दिले होते. जिल्‍हाधिका-यांच्‍या आदेशानुसार सोमवारी नगरपरिषदेने जलशुध्‍दीकरण केंद्राच्‍या परिसरात वृक्षारोपण केले. उपनगराध्‍यक्षा अपर्णा बेडगे, नगरसेविका मंगल सुरवसे यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात आले. यावेळी नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक डी.एन. कस्‍तुरे, मुनीर शेख यांच्‍यासह न.प. चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
 
Top