तुळजापूर :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पूजनातील महत्त्वाचे स्थान असलेला नवीन नगारा बुधवार दि. 16 जुलै रोजी मंदिरामध्ये अर्पण केला जाणार आहे. यावेळी शहरातून मिरवणूक काढून बैलगाडीत नगारा आणला जाणार असून ही बैलगाडी देवीभक्त ओढणार आहेत.
श्री ळजाभवानी मातेच्या पूजनामध्ये नगार्याचे मोठे स्थान आहे. धूप-आरतीसह अंगारा काढताना व सकाळी, सायंकाळी नगारा वाजवला जातो. वापर करून कालांतराने नगारा खराब झाल्यानंतर तो बदलला जातो. सध्या देवीच्या मंदिरात दोन नगारे वाजवले जातात. आता यापैकी एक नगारा खराब झाल्यामुळे दुसरा नगरा आणला जाणार आहे. मिरवणुकीमध्ये विधिवत पारंपरिक पद्धतीने नगारा मंदिरात आणण्यात येणार आहे. यासाठीच्या कार्यक्रमाची मंदिर संस्थानने तयारी पूर्ण केली आहे. शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक फिरवण्यात येणार आहे. यावेळी तुळजाभवानी मातेचे महंत तुकोजी बुवा व चिलोजी बुवा तसेच मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार सुजित नरहरे, दिलीप नाईकवाडी, पुजारी मंडळाचे कार्यकर्ते, आराधी, भाविक, वारूवाले, हलगीवाले सहभागी होणार आहेत. मातंगनगर येथून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. नगारा बैलगाडीमध्ये ठेवून मंदिरात आणण्यात येणार आहे. ही बैलगाडी बैलाद्वारे न ओढता भक्तांकरवी ओढली जाते. नगारा मंदिरात आणल्यानंतर विधिवत पूजन करून देवीला अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी भक्त तुळजापुरात येतात.
नगारा तयार करण्याच्या मान मातंग समाजातील खंदारे कुटुंबीयांना आहे. जिवंत म्हशीच्या कातड्यापासून नगारा तयार करण्यात येत असतो. यासाठी मंदिर संस्थानकडून खंदारे यांना म्हैस दिली जाते. खंदारे कुटुंबीयांच्या या सेवेपोटी मंदिर संस्थान त्यांना दरमहा मानधन देते. ही परंपरा सुरुवातीपासूनच आहे. खंदारे यांच्या अनेक पिढय़ांतील पूर्वजांनी देवीची नगारा तयार करून सेवा केली आहे.
ळजाभवानी मातेच्या प्रत्येक साहित्याला, शस्त्राला अख्यायिका आहे. तशीच नगार्याच्या बाबतीतही अख्यायिका आहे. तुळजाभवानी मातेचे महिषासूरासोबत घनघोर युद्ध झाले होते. यामध्ये देवीने महिषासूराचा वध केला. त्यावेळी त्याने देवीला सदैव पायाजवळ जागा देण्याची प्रार्थना केली होती. यामुळे नगार्याच्या रूपात देवीने त्याला पायाजवळ जागा दिली, अशी अख्यायिका पुराणामध्ये आहे. यामुळे नगार्यासाठी म्हशीचे कातडे वापरले जाते.