उस्मानाबाद :- सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गंत पाडोळी (ता. उस्मानाबाद) येथे शनिवार, दि. 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री मधुकररराव चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या दिवशी विविध विभागांचे तालुका व जिल्हा स्तरावरील अधिकारी याठिकाणी उपस्थित राहून माहिती देणार आहेत. या योजनेचा लाभ महसूल पाडोळी, बेंबळी, व केशेगाव येथील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सुभाष काकडे यांनी केले आहे.
या अभियानाची पुर्वतयारीची बैठक तहसीलदार यांच्या निजी कक्षात घेण्यात आली.
नागरिकांना त्यांच्या कामांसाठी वारंवार तालुका व जिल्हा स्तरावर हेलपाटे मारावे लागू नयेत, त्यांचे काम गाव व महसूल पातळीवर व्हावे आणि प्रशासनाविषयी सकारात्मक प्रतिमा निर्माण व्हावी, याहेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या अडचणी ग्रामस्तरावर सोडवाव्यात, असा यामागील उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत विविध विभागांशी थेट निगडीत योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. यात महसूल विभाग, पंचायत समितीशी निगडीत कामे, शिक्षण, आरोग्य, परिवहन, कृषी, समाज कल्याण आदी विभागांच्या योजनांची माहिती नागरीकांना एकाच ठिकाणी मिळणारआहे.