उस्मानाबाद :- नगरपालिका क्षेत्रात वृक्षलागवड करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ मंगळवारी अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
उस्मानाबाद नगरपालिकेच्यावतीने शहरातील माणिकचौक येथील शिवशंभुराजे नगर येथे वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी अजय चारठाणकर, जिल्हा नागरी विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक कुरवलकर, रोटरी इंटरनॅशनल क्लब, उस्मानाबाद शाखेचे सदस्य तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी वृक्षलागवड मोहिमेस गती देण्याची सूचना केली. जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या क्षेत्रात ही मोहिम राबविण्यात येत आहे. नगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक आणि सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनी सहभाग नोंदवावा. नागरी परिसरात मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी नितीन तावडे, प्रशांत तडवळकर, प्रदीप मुंडे, नितीन काळे, राजेंद्र अत्रे, सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक संचालक, उमाकांत मायकलवार,लागवड अधिकारी पी.बी. बारस्कर, शहा, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी आदिसह विविध मान्यवर उपस्थित होते.