उस्मानाबाद :- राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत शिवछत्रपती क्रीडापीठ, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणा-या नैपुण्य चाचण्या येथील श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथे शुक्रवार, 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे.
     तुळजापूर तालुक्यातील सर्व शाळांनी आपल्या शाळास्तरावरील पात्र ठरलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना उस्मानाबाद येथे वेळेवर पाठवावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी गणेश पवार -9970095315 व संदीप वांजळे (राज्य क्रीडा मार्गदर्शक) -9850954237 या भ्रमणक्रमांकावर संपर्क साधावा. शाळास्तरावर 9 चाचण्याचे आयोजन करुन किमान चाचण्यात 17 गुण प्राप्त करणाऱ्या मुलां-मुलींना चाचण्यासाठी पात्र समाजावे.                    
 
Top