बारुळ (सुधीर सुपनार) :- तुळजापूर तालुक्यातील बारुळ गावासह परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी बळीराजा चांगलाच कामाला लागला आहे. मात्र म्हणावा तितका पाऊस न झाल्याने अद्याप पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे.
पावसाच्या हुलकावणीमुळे गेल्या आठवडाभर चिंतेत असलेल्या बळीराजाला चांगला दिलासा मिळाला आहे. मात्र म्हणावा तितका चांगला पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या समस्येला गावक-यांना तोंड द्यावे लागत आहे. हवामान खात्याने येत्या दोन दिवसात मोठा पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे मोठा पाऊस कधी होईल याची प्रतिक्षा शेतकरी करीत आहेत.