उस्मानाबाद :- राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यावतीने येत्या 22 ते 23 जुलै या कालावधीत जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धा येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे.
     ही स्पर्धा 14 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुले व मुली  या वयोगटातील  विद्यार्थ्यांसाठी आहे. संबधित शाळा व महाविद्यालयातील खेळाडू, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी याची नोंद घेवून आपल्या संघाची प्रवेशिका ओळखपत्रासह स्पर्धेच्या दोन दिवस अगोदर उस्मानाबाद येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावी तसेच  आपला संघ वेळेवर उपस्थित ठेवण्याचे  आवाहन करण्यात आले आहे.
 
Top