उस्मानाबाद :- तुळजापूर येथील तहसील कार्यालयात मंगळवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात नागरीकांनी त्यांच्या अडचणी निवेदनाच्या स्वरुपात प्रशासनासमोर मांडल्या. अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी या नागरीकांच्या अडचणी जाणून घेतल्या. या उपक्रमात एकुण 32 निवेदने प्रशासनास प्राप्त झाली. या निवेदनाबाबत संबंधित विभागांना सदर प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश पाटील यांनी दिले.
यावेळी तुळजापूरचे तहसीलदार काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी विलास खिल्लारे, पोलिस निरीक्षक डी. एन. मुंडे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जी. एस. नरवणे, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक भिमराव दुपारगुडे, तालुका कृषि अधिकारी जाधव यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
नागरीकांची निवेदने स्वीकारल्यानंतर तसेच अडचणी जाणून घेतल्यानंतर पाटील यांनी यावेळी तहसील कार्यालयाच्यावतीने देण्यात येणा*या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत 7 जणाना प्रत्येकी 20 हजार रुपयाचे मदतीच्या धनादेशाचे वाटप केले.