वैराग (महेश पन्हाळे) :- बांधकाम खात्याने लाखो रुपये खर्चून उभारलेले वैराग (ता. बार्शी) येथील दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालयाची अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे कामकाज स्थलांतर प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे वैराग भागातील 61 गावांचे खरेदी-विक्री व्यवहार आधुनिक व नव्या कार्यालयात सुरू होण्याऐवजी केवळ उद्घाटन प्रक्रियेअभावी अवैध धंद्याचे कार्यालय ठरले आहे. अनेक वेळा येथे जुगा-यांचा अड्डाच जमलेला असतो.
वैराग (ता. बार्शी) येथे 1905 पासून दुय्यम निबंधक श्रेणी-1 चे कार्यालय सुरू आहे. या कार्यालयास 114 वर्षे लोटली आहेत. सध्या असलेल्या कार्यालयाची इमारत धोकादायक झाली असून स्लॅबला गळती लागली आहे, खिडक्या कुजल्या आहेत. 61 गावांतील खरेदी-विक्री, गहाणखत, साठेखत आदी कायदेशीर कामे या कार्यालयात होतात. महत्त्वाची कागदपत्रे, व्यवहार प्रती, मुद्रांक, व्यवहाराच्या नोंदी आदी दप्तर कार्यालयाच्या दुरवस्थेमुळे धोकादायक स्थितीत सापडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वैरागच्या मोहोळ चौकाजवळ 40 लाख 80 हजार रुपये खर्चून नवीन दुय्यम निबंधक कार्यालय निर्माण केले. एक वर्ष लोटले तरी या नव्या कार्यालयाला उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता नवीन इमारतीचे ना हरकत प्रमाणपत्र नाही. जुन्या इमारतीमधील विजेचे थकीत बिल भरणे आहे, जुन्या कार्यालयाचे भाडे देणे आहे, अशी उत्तरे ऐकावयास मिळतात. जुने कार्यालय ज्या भागात आहे त्या ठिकाणी लोकांची वर्दळ नाही. वैराग गावातील कोपऱ्यातील अडगळीच्या ठिकाणी कार्यालय असल्याने अधिकारी व एजंटगिरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते.
नवीन दुय्यम निबंधक कार्यालयात आधुनिक रेकॉर्ड रूम, अधिकारी स्वतंत्र कक्ष, खरेदी-विक्री विभाग, संगणक विभाग, मुद्रांक, दस्तऐवज, रेकॉर्ड रूम, शौचालय आदी सुसज्ज व प्रशस्त व्यवस्था आहे. मात्र, गेल्या एक वर्षापासून या इमारतीमध्ये वाढलेले गवत, मोकाट कुत्री आदींचे वास्तव्य दिसून येत आहे. तर इमारतीमध्ये पत्ते , जुगार खेळण्याचा प्रकार राजरोसपणे दिसून येतो. केवळ जिल्हा मुद्रांक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे वैरागचे दुय्यम निबंधक श्रेणी-1 चे कार्यालय कामकाजासाठी स्थलांतर प्रक्रियेची वाट पाहात आहे.

आठ दिवसांत स्थलांतर : मिस्कर
नोंदणी व मुद्रांक जिल्हा निबंधक मंजूषा मिस्कर यांना संपर्क साधला असता त्यांनी वैराग येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज नवीन कार्यालयात आठ दिवसांत सुरू केले जाईल. तसेच जुन्या इमारतीमधून सर्व साहित्य, दप्तर नवीन कार्यालयात हलविण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.