![]() |
| शोभा राऊत |
उस्मानाबाद -: उस्मानाबादच्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शोभा राऊत ह्या फळझाडे व दगडाच्या मावेजाचा धनादेश देण्यासाठी सात शेतकर्यांकडून 39 हजार 200 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी त्यांना अॅन्टी करेप्शन ब्युरोच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवार दि. 16 जुलै रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील त्यांच्या स्वत:च्या कार्यालयात उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली. विशेष म्हणजे राऊत या गेल्या महिन्यातच उस्मानाबाद येथे रुजू झाल्या होत्या. या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
कौडगाव (ता. उस्मानाबाद) येथील एमआयडीसीसाठी मोठय़ा प्रमाणात जमीनी भूसंपादन करण्यात आले आहे. यामध्ये कौडगाव येथील कांही शेतकर्यांच्या जमीनीवरील फळझाडांचाही मावेजा शासनाकडून येणे बाकी होता. त्यानुसार मावेजा मंजूर झाल्यानंतर सदरील रकमेचे धनादेश देण्यासाठी उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांच्याकडून पैशाची मागणी झाल्याची तक्रार उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. यामध्ये सात शेतकर्यांना पैसे मागण्यात आले होते. त्यानुसार उस्मानाबाद येथील पथकाच्या उपाधिक्षक अश्विनी भोसले यांनी कर्मचार्यांसह बुधवारी रात्री उपविभागीय कार्यालयाच्या आवारात सापळा रचला.
उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांनी पैसे घेतल्याची खात्री झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. कौडगाव येथील सात शेतकर्यांचे फळझाडे मावेजापोटी जवळपास 8 लाख रुपये येणे होते. या रक्कमेच्या पाच टक्क्यांप्रमाणे सात जणांकडून 39 हजार 200 रुपये घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. राऊत या महिनाभरापूर्वीच उस्मानाबाद येथे उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या.