उस्मानाबाद : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध रिक्त पदाबाबतच्या लेखी परीक्षा 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत जिल्हा परिषद (कन्या) प्रशाला, शहर पोलीस स्टेशनजवळ, उस्मानाबाद येथे घेण्यात येणार असल्याची माहिती सदस्य सचिव, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी दिली
यादीतील पात्र उमेदवारांच्या नावाची यादी http://osmanabad.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेचे हॉलतिकीट (प्रवेशपत्र) ही टपालाने पाठविण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना टपालाव्दारे प्रवेशपत्र प्राप्त झाले नाही, अशा उमेदवारांनी दि. 2 ते 3 ऑगस्ट या दरम्यान परीक्षा वेळेपुर्वी निर्मल भारत अभियान कक्ष, रुम नंबर 119 पहिला मजला, मुख्य इमारत, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथून घ्यावेत.
तसेच हॉलतिकीट प्रवेश पत्र स्वीकृतीवेळी उमेदवारांनी अर्जाची पोहोच व आपले स्वत:चे सक्षम ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. मुदतीनंतर आलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र दिले जाणार नाही, याची नोंद संबधित उमेदवारांनी घ्यावी,