बारुळ (सुधीर सुपनार) :- तुळजापूर तालुक्यातील बारुळ गावासह परिसरातील गावासाठी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनल) या कंपनीने चार-पाच वर्षापूर्वी टावर उभे केले. सदरील टावर चालवण्याची व मेनटेन्स राखण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीला दिले आहे. या टॉवर बीएसएनल, वोडाफोन, रियाएन्स आदी कंपनीचा नेटवर्क होता. पण संपर्क काहीच होत नसल्यामुळे हे टावर शोभेची वस्तू बनली आहे. गावात टावर असुन सुध्दा मोबाईलला रेंज येत नाही. त्यामुळे गावकरी खूप वैतागले आहेत. येथील ऑपरेटरला संपर्क साधले असता, कॉन्ट्राक्टर जनरेटरसाठी डिझेल देत नाही, म्हणून लाईट गेल्यानंतर टावर बंद होते, असे त्याने बोलताना सांगितले.
सदरील प्रकरणाला कंटाळून वोडाफोन कंपनीने त्यांचा नेटवर्क दुस-या टॉवरला जोडले आहे. बीएसएनलच्या अधिका-याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सध्या हा टावर "असुन अडचण नसून खोळंबा" अशी अवस्था झाली आहे. या टॉवरजवळ अजून एक टॉवर असून तो सुरळितपणे चालू आहे.