उस्मानाबाद :- शहरातील स्टेट बॅंक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील मुलामुलींना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वताच्या पायावर उभा करण्याची किमया साधली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहकार्याने विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन 410 जणांना स्वयंरोजगार उभारण्यासाठी मदत केली आहे.
आजपर्यंत संस्थेने विविध व्यवसायांचे 39 प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. या प्रशिक्षणात मुलामुलींना या व्यवसायाबद्दलची इत्यंभूत माहिती या प्रशिक्षणातून दिली जाते. याशिवाय उद्योग उभारणीसाठी लागणारी कागदपत्रे, बॅंकामार्फत होणारा कर्जपुरवठा, प्रत्यक्ष उद्योग-व्यवसाय सुरु केल्यानंतर कशा पद्धतीने विपणन करायचे याची माहितीही या प्रशिक्षणात दिली जाते. त्याचा लाभ आतापर्यंत 1 हजार 125 युवक-युवतींनी घेतला आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य, निवासी पद्धतीने दिले जात असल्याने हे प्रशिक्षण घेण्यासाठी युवक –युवती उत्सुक असतात.
बॅंकामार्फत कर्ज मिळेल की नाही याबाबत बहुतांशी जणांना शंका असते. मात्र, येथे या केंद्रामार्फतच त्यासाठी पाठपुरावा केला जात नसल्याने कर्ज मिळण्यात सुलभता येते. त्याचा थेट लाभ या युवक युवतींना मिळाल्याने असा स्वयंरोजगार सुरु करणे शक्य झाले आहे.
संस्थेचे संचालक युवराज गवळी यांनी सांगितले की, संस्थेतून प्रशिक्षण घेतल्यानंतर संबंधित प्रशिक्षणार्थी काय करत आहे, याचा दोन वर्षे पाठपुरावा केला जातो. बॅंक, इतर उद्योग आस्थापना यांच्याशी समन्वय साधून संबंधीत प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जाते. याचा लाभ त्यांना स्वयंरोजगार सुरु करताना होतो. जिल्ह्यात असे चारशेहून अधिक युवक-युवती आता स्वताच्या पायावर उभे राहून इतरांना प्रेरणा देत आहेत.
उस्मानाबाद शहरातील औरंगाबाद रोडवरील राजे कॉम्प्लेक्स येथे ही प्रशिक्षण संस्था असून ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ही प्रशिक्षण संस्था कार्यरत असल्याचे श्री. गवळी यांनी सांगितले.
नुकताच संस्थेने युवती व महिलांसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता. हे प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक बी. आर. दुपारगुडे आणि नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी चंद्रशेखर देशपांडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प अधिकारी श्रीपतराव राठोड आदींच्या हस्ते संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
दारीद्रयरेषेखालील युवक, युवती व महिलांनी प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भात संस्थेचे संचालक श्री. गवळी यांच्याशी 7875443799 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.