उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रमुख कारागीर, कनिष्ठ यादासाठी लेखी परीक्षा मार्च,2014 रोजी मध्ये घेण्यात आली. या लेखी परीक्षेत गुणानुक्रमे अर्हताकारी व्यवसाय चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमदेवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
      या परीक्षेत उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, वय, अनुभव आदि अटीबाबत छाननी करुन त्यात पात्र ठरणाऱ-या उमेदवारांची 100 गुणांची व्यवसाय चाचणी ट्रेड टेस्ट घेण्यात येईल. सदर चाचणीत खुल्या प्रवर्गातील व मागासवर्गीय उमेवारांना किमान 30 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय उमेदवार पुरेस न मिळाल्यास मागासवर्गीय उमेदवारासाठी गुण 30 टक्केपर्यंत गुण शिथीलक्षम राहतील. अर्हताकारी व्यवसाय चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमदेवारांची लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणावर 100 टक्के भारांकावर जातप्रवर्ग निहाय गुणवत्तेनुसार मुलाखत न घेता निवड करण्यात येईल, असे राज्य परिवहन महामंडळ,उस्मानाबादचे विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.
 
Top