उस्मानाबाद :- अप्पर आयुक्त आदिवासी विकास, अमरावती या कार्यालयाअंतर्गत वर्ग 3 संवर्गातील प्राथमिक शिक्षणसेवक मराठी / इंग्रजी माध्यमिक शिक्षण सेवक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सेवक, अधिक्षक पुरुष, अधिक्षिका स्त्री, गृहपाल पुरुष, स्त्री, उपलेखापाल, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहायक, आदिवासी विकास निरीक्षक, लिपीक नि टंकलेखक आदि पदांच्या परिक्षा 29 जुन, रोजी घेण्यात येणार होती. परंतु ही परीक्षा आता कांही अपरिहार्य कारणास्तव 5 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. तरी संबधितानी या बदलाची नोंद घेवून परीक्षेस वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांनी केले आहे.