बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशप्रक्रियेसाठी लागणार्या जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, रहिवास, आवास, डोमेसाईल, नॉन क्रिमिलेअर, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र त्वरीत देण्याची व्यवस्था करावी यासाठी बसवेश्वर सेनेच्या वतीने बार्शी तहसिलमध्ये आंदोलन करुन निवेदन देण्यात आले.
मागील अनेक दिवसांपासून बार्शी तहसिलच्या अंतर्गत सेतू कार्यालयात सर्व आवश्यक अर्ज सादर करुनही चिरीमिरी मिळविण्याच्या उद्देशाने अडवणूक करण्यात आली. अनेक दलालांची फौज तहसिल कार्यालयाच्या आवारात घुटमळतांना दिसून येत होती व गरिब गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेचे शहराध्यक्ष दिपक आंधळकर, बसवेश्वर सेनेचे अध्यक्ष आकाश गावसाने यांच्याकडे आल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन बार्शी तहसिलमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसिलदार एस.एस.गायकवाड यांनी तहसिलदार बालाजी सोमवंशी यांचेशी संपर्क साधून दोन दिवसांत सर्व विद्यार्थ्यांचे दाखले देण्याची व्यवस्था करु असे आश्वासन दिले. यावेळी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांची कोणी अडवणूक करण्यासाठी अथवा गैरप्रकार होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करु व तात्काळ दाखले देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सांगीतले.
यावेळी उमेश कांबळे, उमेश आंधळकर, मामा भिसे, रोहन कोल्हे, रोहित डोंबे, विजय गायकवाड, सूरज वाणी, सागर पवार, आशपाक शेख, विशाल जाधव, सागर गावसाने, अनिल आंधळकर, आण्णा माने, गणेश पवार, सूरज चेट्टी यासह अनेक कार्यकर्त्ते उपस्थित होते.