बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी वकील संघाची निवडणूक ५ जुलै रोजी होत असून अध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत होत आहे. वकील संघाचे २४५ सदस्य असून न्यायालय आवारात गटागटाने चर्चा करुन अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अध्यक्षपदासाठी प्रथमच यावेळी पाच उमेदवार उभे राहिले असून यामध्ये बार्शी तालुका कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अॅड. सुभाष जाधवर, नोटरी एम.बी. धारुरकर, अॅड. नीलकंठ कुलकर्णी, अॅड. पुरुषोत्तम गोरे, अॅड. दिनेश देशमुख यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.
उपाध्यक्षपदासाठी अॅड. एस.एस. क्षिरसागर, अॅड. एस.एच. नायकोजी यांच्यात तर लायब्ररी चेअरमनपदासाठी अॅड. अविनाश गायकवाड, अॅड. शंकर ननवरे यांच्यात लढत होत आहे.
सचिवपदी अॅड. एन.एस. सावंतर यांची तर खजिनदारपदी अॅड. मुजाहिद तांबोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. सौ. एस.एस. सावंत, सहा.नि.नि.अधि. अॅड. मनोज गुरव व अॅड. जे.बी. जाधव हे काम पाहत आहेत.