बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील महात्मा फुले प्रतिष्ठानच्या वतीने माळी समाजातील चौथी, सातवी मधील शिष्यवृत्ती तसेच दहावी, बारावीच्या परीक्षेत सुयश संपादन केलेल्या गुणवंतांचा पंचायत समितीच्या सभापती कौसल्या माळी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संत तुकाराम सभागृह येथे दि.२९ रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंदाराणी आतकर, परांडा पं.स.सभापती काशीबाई इतापे, ऍड्.वासुदेव ढगे, सुरेश राऊत, संतोष वाघमारे, स.पो.नि.अभिषेक डाके आदि उपस्थित होते.
इयत्ता बारावीतील गुणवंत उदयकुमार इतापे, प्रिती फुले, अनुराधा वाघमारे , इयत्ता दहावीतील ओंकार भोसले, विवेक माळी, दिपा फुले यांना सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचलन संजय मोरे, सुमित मिरगणे यांनी केले, अध्यक्ष शितल नाळे, दिनेश नाळे, आबा ढगे, खंडू मेहेर, आण्णा इतापे, सतिश राऊत, तात्या भानवसे यांनी परिश्रम घेतले.