प्रारंभी पालकमंत्री सोपल यांनी माऊलीच्या अश्वचे पुजन केले.ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम च्या जय घोषात वैष्णवजनांनी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात प्रवेश केला.या प्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपुते, सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एन.रामास्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, माळशिरसचे प्रांतधिकारी शैलेश सुर्यवंशी, फलटणचे प्रांतधिकारी राजेंद्रकुमार जाधव, माळशिरसचे तहसिलदार विजय पाटील, फलटणचे तहसिलदार विवेक जाधव, माळशिरसचे गटविकास अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे, धर्मपूरीचे सरपंच विजय पाटोळे, पालखी सोहळा प्रमुख शिवाजीराव मोहिते, मालक बाळासाहेब आरफळकर यांच्यासह महावितरण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आदी विभागाचे संबंधित प्रमुख अधिकारी उपस्थित होते
विठूरायाला लवकरात-लवकर भेटावे या अनावर अवस्थेत सर्व वैष्णवजण पंढरपूरकडे वेगाने वाटचाल करीत आहेत.धर्मपूरीच्या आगमनानंतर आज पालखी नातेपुते येथे मुक्कामी आहे.आता काही पावलेच सावळा विठ्ठल दुर राहिला आहे.विठूरायाला डोळयात साठविण्याबद्दलचा आनंद प्रत्येक वारक-याच्या चेह-यावरुन यावेळी ओसांडुन वाहत होता.