बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील महाराष्ट्र दलित युवक महासंघाच्या वतीने लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दि.२ ऑगस्ट रोजी बार्शीतील स्वयंवर मंगल कार्यालयात सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती संघटनेचे धनंजय ढावारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
संघटनेच्या वतीने विवाह सोहळ्याचे ह चौथे वर्ष असून यावर्षी पंधरा जोडप्यांना सोन्याचे मणी मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी, लग्नातील वर्हाडी यांच्या भोजनाची सोय करण्यात येणार आहे. या विवाहासाठी लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची सून सावित्रीबाई साठे, राजेंद्र मिरगणे, धनराज थोरात, उत्तमप्रकाश खंदारे, मारुती दाखले, ब्रिजमोहन फोफलिया, महेश भंडारी आदी उपस्थित राहणार आहेत. विवाह सोहळ्यासाठी नोंदणी करावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे. विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी धनंजय ढावारे, कृष्णा चव्हाण, बाळासाहेब जाधव, बाबासाहेब शेंडके, विष्णु दांगट आदी परिश्रम घेत आहेत.