बार्शी -: तालुक्यातील लोकप्रतिष्ठा विचार मंच व संभाजी ब्रिगेडच्या वतीने बार्शी तहसिलकडे जातीचे दाखले त्वरीत देण्याची व्यवस्था करण्याचे लेखी निवेदन दिले आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाकडील अहवाल क्र. 22, राज्यात शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश केल्याचा आदेश दि. 15 जुलै रोजी पारित करण्यात आला आहे. याप्रमाणे तात्काळ लाभ मिळणार असल्याचे आदेशात म्हटले असून प्रमाणपत्रासाठी सादर करावावयाच्या कागदपत्रांमध्ये संभ्रमावस्था दिसून येते. चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेशाची 28 तारीख ही अंतीम मुदत आहे. शैक्षणिक प्रवेश व नोरकी भरती प्रक्रिया सुरु असताना दाखले वेळेवर मिळत नसल्याने गरजू लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. नागरिकांच्या सोयीसाठी जातीचे प्रमाणतप्रत कॅम्प सर्कलमध्ये देण्याची व्यवस्था दररोजच्या वेळेसोबत सुट्टीच्या दिवशीही करावी, असे निवेदनात म्हटले आहे.