उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील चिंचपुर (बुद्रुक) येथील पशुवैद्यकीय दवाखान्‍याच्‍या इमारतीत चक्क अवैध देशी-विदेशी दारुचा साठा सापडला आहे. या दवाखान्‍यास गोवा राज्यातुन आलेली दारुचे ५० बॉक्ससह १ लाख रुपयाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.
    परंडा तालुक्यातील चिंचपुर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात दारु साठवली असल्याची माहिती सुत्रांमार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांना मिळाली. त्यानुसार गुरुवार दि. २४ जुलै रोजी दुपारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी या पशुवैद्यकीय दवाखान्‍यात छापा मारला असता त्‍यांना या रुग्णालयात चक्क ५० विदेशी दारुचे बॉक्स आढळुन आले. याची किंमत १ लाख रुपयाहुन अधिक असुन छापा टाकण्यास आलेले अधिकारी पाहुन २ आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
    ही कारवाई राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या अधिक्षक स्‍नेहलता श्रीकर, निरीक्षक पी.जी. कदम, उपनिरीक्षक संतोष जगदाळे, संजय राठोड यांच्‍यासह कर्मचा-यांनी यशस्‍वी केली.
 
Top