पांगरी (गणेश गोडसे) :- एका चाळीस वर्षीय अनोळखी बेवारस इसमाचा विहिरीतील पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना रविवार रोजी सायंकाळी जामगांव (आ) ता.बार्शी शिवारात उघडकीस आली आहे.
विजय आवटे (वय 38, रा.जामगांव) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, त्यांची जामगाव शिवारात पुणे-लातुर राज्यमार्गालगत शेती आहे. हॉटेल अश्विनीच्या पाठीमागील बाजुस गट नंबर 314 मध्ये असलेल्या त्यांच्या मालकीच्या शेतातील विहीरीत रविवारी चाळीस वर्षिय अनोळखी बेवारस इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना त्यांना आढळुन आला. पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याचा पोलिसांचा निषकर्ष आहे. मृतदेह विहीरीबाहेर काढुन पांगरी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह राखुन ठेवण्यात आलेला आहे.
मयताला कुसळंब येथील टोलनाक्यावर पाहिल्याचे व आपण लातुर येथील असल्याबाबतचे त्याने सांगितल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विजय आवटे यांनी दिलेल्या खबरीवरून पांगरी पोलिसात आकस्मात मयत म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास हवालदार सुधाकर ठाकर हे करत आहेत.