पांगरी (गणेश गोडसे) :- पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटुन जाऊनही अद्यापर्यंत बार्शी तालुक्यात वरूणराजाने साधी हजेरीसुध्दा लावलेली नसल्यामुळे तालुक्यातील उस उत्पादकांसह सर्वसामान्य बळीराजा भयभित झाला आहे. तशातच मुख्यमंत्र्यानी शेतीला सुरू असलेला पाणीसाठा हा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे जाहीर केले आहे. यामुळे तलावावरून ऊस शेती अवलंबुन असणा-या शेतक-यांचे धाबे दणाणले आहेत. आता पुढे काय करायचे या एकाच विचाराने शेतक-यांना चक्रावुन सोडलेले आहे. बहुतांश ऊस शेती ही साठवण तलावातील साठयावरच अवलंबुन आहे. निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास कोटयावधी रूपयांचा फटका बसुन शेतकरी नागावला जाणार आहे. ऊस उत्पादक शेतक-यांच्या डोळयासमोर तर दिवसा काजवे चमकु लागले आहेत. पाऊसाने अजुन कांही दिवस ओढ दिल्यास तालुक्यातील उस उत्पादकांचे कोटयावधी रूपयांचे नुकसान होणार असुन याचा साखर कारखानदारीसह दैनंदिन जनजिवनावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाइ उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता जानकारांमधुन वर्तवली जाऊ लागली आहे. ये रे माझ्या मागल्या या म्हणीप्रमाणेच पुन्हा दुष्काळी परिस्थतीच्या पाऊलखुना दिसुन येऊ लागल्या आहेत.
गत चार वर्षांपासुन सलग बळीराजा दुष्काळी छायेतच जगत आहे. प्रत्येक वर्षी गेलेले वर्षच बरे अस म्हणण्याची वेळ आली आहे. गतवर्षी पावसाळयाच्या शेवटच्या टप्यात का होइना वरूणराजाने हजेरी लावली होती. पडलेल्या अल्पशा पावसावर गत हंगामात शेतक-यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून ऊस शेतीची लागवड करत उसाची शेती जोपासली होती. सध्या कांही शेतक-यांचा उस तीन तर कांहीचा सहा कांडयावर आलेला आहे. पावसाळा जवळ आल्याचे गृहीत धरून ऊस ऊत्पादकांनी उसाला माती लावुन घेऊन फक्त पावसाचीच प्रतिक्षा करत बसले आहेत. मात्र बरेच दिवस उलटुन जावुनही अदयापर्यंत पावसाने पाठ फिरवल्यामुळे व शासनाचे हवामान खातेही इतर खात्याप्रमाणेच बेभरवशाचे झाल्यासारखे वाटत आहे. ऊस उत्पादक शेतक-यांचे उस वाळुन नुकसानग्रस्त होऊ लागलेले आहेत. कदाचित भविष्यात पाऊस पडलाच तरी ऊस उत्पादनात भरीव तुट होणार हे नक्कीच. सलग दुष्काळाचे चटके सोसत असलेल्या शेतक-यांच्या नशिबी पुन्हा दुष्काळीच स्थिती निर्माण होत आहे.
शेतक-यांची भिस्त आता आद्रा नक्षत्रावर आहे. मात्र हे नक्षत्रही आल्या पावले कोरडेच जाते काय अशीच चिन्हे दिसुन येत आहेत. पावसाळयाचे दिवस सुरू असतानाही दिवसभर उन्हाळयासरखे कडक उन पडत आहे. सुसाट वारे वाहुन रात्री पुन्हा हिवाळयाप्रमाणे थंडी जाणवत आहे. आकाशाकडे पाहिल्यास ढगांचे अस्तित्वच जाणवत नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये भितीसदृष्य वातावरण तयार झाले असुन घरात ठेवलेल्या जीवनाश्यक वस्तुंची विक्री करण्याचे टाळले जाऊ लागले. निदान चटनी भाकरी खाऊन तरी पोटाची खळगी भरणे हे एकच उदिष्ठ शेतक-यांनी समोर ठेवले आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बाजारपेठेवरही जाणवत असुन व्यापारपेठेतील वर्दळ दिवसेंदिवस कमी होऊ लागलेली आहे. बाजारपेठत ग्राहक नसल्यामुळे कोणत्याच वस्तुला उठाव नाही. त्यामुळे व्यापारी दुकानदारवर्गांचेही धाबे दणाणले आहेत. किराणा दुकानदार तर शेतक-यांना उधार देणेही टाळु लागले आहेत. या प्रकारावरून भविष्याच्या संकटाची चाहुल लक्षात येऊ शकते.