पांगरी (गणेश गोडसे) :- एका महिलेच्या घरात घुसुन विनाकारण तिला व तिच्या घरातील लोकांना काठी, चैन व दगडाने बेदम मारहान करून जखमी केल्याची घटना पिंपळवाडी (ता. बार्शी) येथे घडली. चैनने मारहान करून जखमी केल्याप्रकरणी गावातीलच पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उषा बाळासाहेब चौधरी, त्यांची मुलगी व मुलगा अशी मारहाणीतील जखमींची नांवे असुन बिभिषण संभु चौधरी, रामा संभु चौधरी, पपु बिभिषण चौधरी, बिभिषण चौधरी व त्याचा मुलगा अशी मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे आहेत.
जखमी ऊषा चौधरी या महिलेने पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्या व त्यांची मुलगी घरात बसलेल्या असताना वरील आरोपींनी घरात प्रवेश करून त्यांच्या मुलीला घराबाहेर काढुन घराला आतुन कडी लावुन घेऊन शिविगाळ दमदाटी करत चैनने लाकडाने व दगडाने बेदम मारहाण करूण जखमी केले. तसेच नंतर त्यांच्या मुलगा व मुलीसही मारहान करून जखमी केले. पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. अधिक तपास पोलिस करत आहेत.