पांगरी (गणेश गोडसे) :- घरासमोरील अंगणात लॉक करून लावलेली दुचाकी मोटारसायकल अज्ञात चोरटयाने कुलुप तोडुन चोरून नेऊन पस्तीस हजार रूपयांचे नुकसान केल्याची घटना बावी (ता. बार्शी) येथे रविवार दि. 29 जून रोजी घडली.
सचिन सुधाकर गव्हाणे (वय 25, रा. बावी) असे दुचाकी चोरी झालेल्याचे नांव आहे. गव्हाणे या तरूणाने पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, शनिवारी रात्री ते रात्रीचे जेवण झाल्यानंतर घरात झोपले होते. त्यांच्या मालकीची एम.एच.13 बी.एम.0418 ही हीरो होंडा कंपनीची 35 हजार रूपये किंम़तीची दुचाकी लॉक करून घरासमोरील अंगणात लावलेली होती. रात्री अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या संमतीविना हॅन्डल लॉक तोडुन त्यांची दुचाकी चोरून नेली. गाडीमालकाच्या फिर्यादिवरून अज्ञात चोरटयांविरूध्द गाडी चोरून नेऊन पस्तीस हजार रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास श्रीमंत बिराजदार करत आहेत.