नळदुर्ग -: येथील राष्ट्रीय महामार्गालगत तुळजापूर फाट्याजवळ 50 खाटांचे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामाचे भव्य भुमीपुजन समारंभ सोमवार दि. 14 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता होत आहे. या ग्रामीण रुग्णालयामुळे नळदुर्ग शहरांतर्गत येणा-या जवळपास चाळीसपेक्षा अधिक गावातील ग्रामस्थ व राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना आरोग्याची सुविधा उपलब्ध झाल्याने सर्वत्र पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांचे अभिनंदन होत आहे.
राज्याचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचे भुमीपूजन होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड हे राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. राहुल मोटे, आ. दिलीपराव देशमुख, आ. ज्ञानराज चौगुले, आ. सतीश चव्हाण, आ. ओमराजे निंबाळकर, आ. विक्रम काळे, आ. बसवराज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नानरवरे, जि.प. च्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती सुमन रावत आदींजण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी, नरेंद्र बोरगावंकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, कॉंग्रसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जि.प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष शहबाज काझी, शब्बीरअली सय्यद सावकार, उपनगराध्यक्षा अर्पणा बेडगे, तुळजापूर पं.स. सभापती मनिषा पाटील, कॉंग्रेस शहराध्यक्ष नवाज काझी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास शहर व परिसरातील नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आरोग्य सेवा लातुर मंडळाचे उपसंचालक डॉ. एस.पी. पाटील, जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. जयपाल एम. चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता एस.आर. कातकडे, कार्यकारी अभियंता एस.जी. देशपांडे यांनी केले आहे.