उस्मानाबाद :- नेहरु युवा केंद्राच्यावतीने 24 जुले रोजी जिल्हास्तरीय युवक मेळावा घेण्यात येणार असून त्याची पुर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांचे अध्यक्षेखाली संपन्न झाली.
      यावेळी उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, राम मिराशे, लिड बँकेचे अधिकारी श्री. दुपारगुडे, नेहरु युवा केंद्राचे युवा समन्वयक आर. एम. कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते.
        या मेळाव्यात ग्रामीण आरोग्यात शौचालयाचे महत्व, महिला सबलीकरण, सशक्त भारतासाठी व्यसनमुक्ती युवक, सामाजिक असमानता, कृषि विकास याविषयावर  जिल्ह्यातून आलेल्या नेहरु युवा केंद्राचे कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले.
      युवकांनी शासनाच्या विविध विकासाच्या योजना जनतेच्या घरापर्यंत पोहचवून त्या योजनेचा लाभ त्यांना देण्याचा प्रयत्न करावा, असे शिल्पा करमरकर यांनी सांगितले. तसेच व्यसनमुक्ती महिला सबलीकरण यासाठीसुध्दा युवकाप्रमाणे युवतींनी देखील पुढाकार घेवून कार्य करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
    यावेळी येत्या 24 जुलै रेाजी होणा-या युवक मेळाव्याची रुपरेषा ठरविण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील नेहरु युवा मंडळाचे कार्यकर्ते व संबधित अधिकारी उपस्थित होते.
 
Top