उस्मानाबाद :- समाजातील गोरगरीबांच्या हिताच्या अनेक विविध योजना राज्य शासन राबवित आहे. आरोग्य विभागातर्फे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, आरोग्य कवच योजनेअंतर्गत प्रती कुटुंब प्रत्येक वर्षी 1 लाख 50 हजारापर्यंत उपचार मोफत, 971 आजारावंर उपचार करुन शस्त्रक्रिया आणि शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी राज्यातील दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत 25 टक्के आरक्षण दिल्याने सुमारे 2 कोटी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला. असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी बोळेगाव येथे बोलताना केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, तुळजापूर विकास प्राधिकरणचे सदस्य अप्पासाहेब पाटील, कृषि सभापती पंडित जोकार, नायब तहसीलदार वाझे, पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य सुर्यवंशी, यांच्यासह गावचे सरपंच व विविध तालुकास्तरीय यंत्रणांच्या प्रमुखांची उपस्थिती होती.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, माजी पंतप्रधान कै.राजीव गांधी यांच्यामुळे आपणास दळणवळणाची मुबलक प्रमाणात साधने उपलब्ध झाली. दुरदर्शन, मोबाईलच्या क्रांतीमुळे घरबसल्या जगाची माहिती होत आहे. माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी निराधारांना आधार देण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, बेघरांना इंदिरा आवास योजनेव्दारे हक्काचे घर दिले. राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी संजीवनी राबविल्याने थकलेल्या वीज बिलावर 50 टक्के माफीची योजना केल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. श्रावण बाळ योजनेचा अनेक जण लाभ घेत आहेत. ग्रामीण भागातील गरीबांना नाडणाऱ्या बेकायदा सावकारी करणाऱ्यांवर प्रतिबंध करण्यारा कायदा राज्य शासनाने आणला. त्यामुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले असल्याचे त्यांनी नमूद केले.
वीज वितरण कंपनीने वीजचोरी व गळतीचे प्रमाण कमी करावे, चुकीची वीज देयक तात्काळ दुरुस्त करावीत. अखंडीत वीजपुरवठा करावा, अशा सूचना श्री. चव्हाण यांनी यावेळी दिल्या. शेतक-यांनी थकीत वीजेची थकीत देयके वेळेत करुन कृषि संजीवनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ग्रामविकासासाठी गावातील सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक असते. गाव अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी शासन योजनांचा चांगल्या प्रकारे लाभ घेऊन प्रगती साधण्याचे आवाहन त्यांनी केले. चव्हाण यांनी बोळेगावसह तुळजापूर तालुक्यातील कुन्सावळी व लोहगाव आदि गावास भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली करुन गावक-यांचे अडचणी जाणून घेतल्या.
डॉ. व्हट्टे म्हणाले की, पालकमंत्री श्री.चव्हाण यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यांनी केलेले भगीरथ प्रयत्नामुळे जनतेचे व ग्रामस्थ आणि शेतक-यांचे विकासात मोलाची भर पडली आहे.
अप्पासाहेब पाटील यांनी पालकमंत्री श्री.चव्हाण हे ग्रामीण भागातील जनता, शेतकरी केंद्रबिंदु नजरेसमोर ठेवून विकास करत असल्याचे नमुद केले. बोळेगाव व कुन्सावळी या गावच्या भेटी दरम्यान गावक-यांनी वीज, रस्ता, निराधार योजना, शिधापत्रिका आदि कामाचे निवेदन पालकमंत्रीमहोदयांकडे सादर केले.