उस्मानाबाद :- नळदुर्ग आणि परिसरातील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्यावरील उपचारांसाठी अद्यावत असे 50 खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारणी कामाचा शुभारंभ सोमवारी राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते झाला. याशिवाय, तात्काळ आरोग्य उपचारांसाठी 108 क्रमांक डायल करुन मिळणा-या सुविधांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळाही त्यांच्या हस्ते पार पडला. जिल्ह्याच्या विकासासाठी आतापर्यंत चारशे कोटींहून अधिक निधी मिळवला असून विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग तुळजापूर-नळदुर्ग मार्गावर नळदुर्ग शहरालगत 50 खाटांचे ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा भूमीपूजन समारंभ पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार रविंद्र गायकवाड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार ज्ञानराज चौगुले, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, माजी आमदार सि. ना. आलुरे गुरुजी व नरेंद्र बोरगावकर, तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य आप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य सर्वश्री पंडीत जोकार, धीरज पाटील, सुधाकर गुंड, सचिन पाटील, शाहबाजकाझी, उपनगराध्यक्षा अपर्णा बेडगे, गोदावरी केंद्रे, नारायण समुद्रे, अशोक जवळगे, पार्वती घोडके, प्रकाश चव्हाण, नय्यरपाशा जहागीरदार, सुनील चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. आर. कातकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जयपाल चव्हाण, कार्यकारी अभियंता एस.जी. देशपांडे आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, नळदुर्ग येथे ब-याच वर्षापासूनची मागणी प्रलंबित होती. जागेअभावी हा प्रश्न मार्गी लावता येत नव्हता. मात्र, तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत पुढाकार घेऊन नगरपालिकेच्या आणि वनविभागाच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लावला. या कामासाठीचा 21 कोटी रुपयांचा निधी संबंधित विभागाकडे प्राप्त झाल्याने हे काम अधिक गतीने पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नळदुर्ग हे महामार्गावरील गाव असल्याने आणि अपघाताचे प्रमाण वाढल्याने येथे ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता होती. जिल्ह्यातही आरोग्य सुविधांसाठी राज्य सासनाकडून मोठ्या प्रमाणात भरीव निधी आणल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय तसेच नर्सिंग कॉलेज,, उमरगा येथील ट्रॉमा सेंटर, तुळजापूर ग्रामीण रुग्णालय, वाशी आणि बेंबळी येथील आरोग्य सुविधांसाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे.
जिल्हाविकासासाठी जेवढा शक्य आहे, तेवढा निधी राज्य शासनाकडून प्राप्त करुन घेतला आहे. याशिवाय मागील वर्षी टंचाईमुळे खरीप पीकांना मोठा फटका बसला होता. त्यासाठी शासनाकडून पाठपुरावा करुन जवळपास दोनशे कोटी रुपये अनुदान तर गारपीटीमुळे फटका बसल्याने 191 कोटी रुपयांचे अनुदान जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्राप्त करुन घेतले, असे श्री. चव्हाण यांनी नमूद केले.
नळदुर्ग हा परिसर पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्याबाबतही आवश्यक ती सर्व मदत राज्य शासन करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. व्हट्टे यांनी तात्काळ आरोग्य उपचारांसाठी हे ग्रामीण रुग्णालय सर्वसामान्यांना मोठा आधार ठरणार असल्याचे सांगितले. पालकमंत्री चव्हाण यांच्या विकासाच्या भूमिकेमुळे आणि जिल्ह्यात विकासकामे करताना सर्वांना बरोबर घेऊन चालण्याच्या भूमिकेमुळे विकासकामांनी गती पकडल्याचे नमूद केले.
खासदार गायकवाड यांनी केंद्र शासनाकडील विविध योजनांसाठीचा निधी जिल्ह्यात आणणार असल्याचे सांगितले. ग्रामीण रुग्णालय हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री चव्हाण यांचे विशेष कौतुक केले.
आमदार चौगुले यांनी पालकमंत्री चव्हाण हे नेहमीच विकासाचे काम करण्यात अग्रेसर असल्याचे सांगितले. या माध्यमातून चांगली सुविधा निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आप्पासाहेब पाटील, आलुरे गुरुजी आणि बोरगावकर यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहबाज काझी यांनी केले. नळदुर्ग विकासासाठी पालकमंत्री चव्हाण मोठे योगदान देत आहेत. नगरपालिका व परिसरात विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देउन नळदुर्ग विकासाचा त्यांचा प्रयत्न सुरुच असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी उभारण्यात येत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची माहिती दिली. मराठवाडा विकास कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नातून हे रुग्णालय आकाराला येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातील नगरपरिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.