बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील दिनकर रुद्राके यांच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्व पोटजातींकरिता वधू-वर परिचय मेळावा होत आहे. रविवार दि. २७ जुलै २०१४ रोजी, सकाळी १० वाजता छत्रपती भवन, लातूर रोड येथे हा मेळावा होत असल्याचे आयोजक दिनकर रुद्राके यांनी सांगीतले.
बार्शीतील यापूर्वी आयोजित केलेल्या तीनही मेळाव्यांमध्ये मिळालेल्या प्रतिसादानंतर या चौथ्या मोफत मेळाव्याचे आयोजित करण्यात आले आहे. काही पालक वधू वरांना सोबत घेऊन येत नसल्याने त्यांच्या परिचयामध्ये अडचणी निर्माण होत असल्याने येतांना वधू अथवा वरांना सोबत घेऊन यावे. सोबत वधू वरांचे परिचयपत्र व नुकतेच काढण्यात आलेले छायाचित्र सोबत घेऊन यावे असे आवाहन रुद्राके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दिनकर रुद्राके (भ्र.ध्व.) ९८५०४३१८२६, ९९७५९४३४२४ या क्रमांकावर संपर्क साधावा.