बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी बार्शी शहर व तालुका संषर्घ समितीच्या वतीने मंगळवारी दि.१५ रोजी बार्शी तहसिलकार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केल्यानंतर राज्यभर विध ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचा ठराव घेण्यात आला होता. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल तसेच लिंगायत समाजाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. बार्शीतील आडवा रस्ता येथील १७ वा पुठ्ठा गणपती मंदिर येथून सकाळी ११ वाजता हा मोर्चा काढण्यात येणार असून शहर व तालुक्यातील समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन समितीने केले आहे.