कळंब -: समाजामध्‍ये दिवसेंदिवस कुटुुंब नावाची संस्‍कृती उध्‍दवस्‍त होत चालली आहे. जर कुटुंब संस्‍कृती उध्‍दवस्‍त झाली तर देश कसा चालेल, अशी खंत ज्‍येष्‍ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी कळंब येथे राेटरी क्‍लबच्‍या पदग्रहण समारंभाप्रसंगी बोलताना व्‍यक्‍त केली.
         पुढे बोलताना फुटाणे म्‍हणाले की, कुटुंब संस्‍कृती टिकली नाही तर काही दिवसानी घरामध्‍ये म्‍हाता-या माणसांचे फोटो लावायला जागा देखील शिल्‍लक राहणार नाही. तसेच टीव्‍हीवर दाखवल्‍या जाणा-या जाहिराती, रस्‍त्‍यावर लावले जाणारे डीजिटल, जाती धर्मातील भेद आदी विषयावर सडेतोड मत त्‍यांनी प्रकट केले. 
       यावेळी  सहयोग या वार्तापत्राचे प्रकाशन करण्‍यात आले. तसेच कळंब शहरातील दहावी, बारावीच्‍या परीक्षेत उत्‍कृष्‍ठ गुण घेऊन उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांचा यथोचित्‍त सत्‍कार करण्‍यात आला. त्‍याचबरोबर आट्यापाट्या स्‍पर्धेसाठी महाराष्‍ट्राचे नेतृत्‍व करणा-या व निवड झालेल्‍या खेळांडूचा सत्‍कारही यावेळी करण्‍यात आला. 
     यावेळी रोटरी क्‍लब कळंबचे मावळते अध्‍यक्ष अॅड. दत्‍ता पवार, सचिव जितेंद्र शहा यांनी आपला पदभार नूतन अध्‍यक्ष डॉ. रामकृष्‍ण लोंढे, सचिव ब्रिजलाल भुतडा यांच्‍याकडे सोपविला. यावेळी उपप्रांतपाल भुजंग शेट्टी हे प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्थित होते.
     कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी श्रीकांत कळंबकर, विक्रम गायकवाड, सुशील तिर्थकर, पंडीत दशरथ, सतीश मांडवकर, किशोर मोरे, संजय देवडा, गिरीश कुलकर्णी यांच्‍यासह रोटरीचे सर्व सदस्‍य यांनी विशेष परीश्रम घेतले.
 
Top