उस्मानाबाद :- हरितक्रांतीचे प्रणेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील विविध धोरणांमुळेच महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रात अग्रेसर राज्य ठरले आहे. कृषी विद्यापीठांची स्थापना, कृषी संशोधनाला चालना आणि नवनवीन वाणांची निर्मिती अशाप्रकारे राज्याच्या कृषी क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. राज्यात १९७२ च्या दुष्काळात त्यांनी केलेले काम अतुलनीय होते, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
जिल्हा परिषदेचा कृषि विभाग आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त मंगळवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे हे होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, कृषी सभापती पंडित जोकार, जि.प. सदस्य काशीनाथ बंडगर, श्री. जवळगे, प्रादेशिक कृषी सहसंचालक के. एन. देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी विकास अधिकारी मदनलाल मिणीयार यांची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते स्व. नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, स्व. नाईक यांचे कृषी क्षेत्रासाठी फार मोठे योगदान आहे. शेतीत त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. कृषी संशोधकांना संशोधन करण्यासाठी प्रेरणा दिली. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांचे खूप मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. स्व. वसंतराव नाईक हे भविष्याचा वेध घेणारे व्यक्तीमत्व होते, असे सांगून १९७२ मध्ये महाराष्ट्राला दुष्काळातून पुन्हा उभारी घेण्याचे काम त्यांनी केल्याचे श्री. चव्हाण यांनी नमूद केले.
कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी आणि आर्थिक ताकद देण्यासाठी या योजना महत्वाच्या आहेत. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतला पाहिजे, असे प्रतिपादनही श्री. चव्हाण यांनी केले.
डॉ. व्हट्टे यांनी स्व. नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल ऋण व्यक्त केले. बांधकाम विभागाचे अभियंता डी. एन. सूर्यवंशी यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याची माहिती यावेळी दिली.
प्रास्ताविकात, श्री. तोटावार यांनी कार्यक्रमाबाबतची रुपरेषा सांगितली. कृषी विभागाच्या वतीने शेतक-यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहितीही त्यांनी दिली.
त्यानंतर पालकमंत्री चव्हाण आणि मान्यवरांच्या हस्ते शेतक-यांना प्रातिनिधीक स्वरुपात बी.बी.एफ. यंत्रांचे वाटप अनुदान तत्वावर करण्यात आले.