उस्मानाबाद :- हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शिल्पा करमरकर यांनी स्व. नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, तहसीलदार श्रीमती मोरे आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.