
रविवारी दि.२९ रोजी पद्मकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित तरुण कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी मांगडे, अध्यक्षस्थानी श्रीकांत आण्णा शिंदे, उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, नवनाथ चांदणे, नगराध्यक्ष कादर तांबोळी, ऍड्.असिफ तांबोळी, विलास रेणके, नागेश अक्कलकोटे, माजी नगरसेवक शशिकांत वायकुळे, अतुल इटकर, मनिष चौहाण, भगवान पवार यांसह राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना सोपल म्हणाले, प्रत्येक निवडणुकीमध्ये भिन्न राजकीय वातावरण पाहायला मिळते. जसेजसे खालच्या राजकीय निवडणुका असतील तर चुरस वाढल्याचे दिसून येते. उमेदवाराचे बॅकग्राऊंड पार्श्वभूमी, केलेल्या व न केलेल्या कामांचा हिशोब, संपर्क व तरुण सहका-यांचे पाठबळ आणि त्यांची निवडणुकांच्या निमित्ताने कामाची धडाडी याचा एकत्रित परिणाम यश अपयशामध्ये दिसून येतो. हा प्रातिनिधीक विचार करताना कोणाला कमी लेखून चालत नाही. स्वतः बद्दल फाजील आत्मविश्वास नसावा, पक्षाचे पदाधिकारी, नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती इत्यादींसह बारमाही सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवत वैयक्तीक व सार्वजनिक कामांतील तुमच्या सहभागाला सतत पाठबळ देण्याचे काम आपण अखंडपणे सुरु ठेवल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.