पांगरी (गणेश गोडसे) :- आजकाल पैशासाठी माणुस माणसाच्या जिवावर उठतोय. पैशा, संपत्ती, सोनं, नाणे या मोहजालाच्या मागे जग धावत असुन पैशासाठी कांहीही, अशीच कांहीशी समाजधारणा वृदधींगत होत चाललेली आहे. मात्र आजच्या या संवेदनाहिन जगातसुध्दा नितीमुल्ये ढळु न देता नितीमुल्यांची जपवणूक करणारी माणसंही शिल्लक असल्याचाच प्रत्यय पांगरी (ता.बार्शी) येथील सचिन ठोंबरे या निस्वार्थी व प्रामाणिक तरूणाने दाखवलेल्या धाडसामुळे पांगरीकरांना येत आहे.
पांगरीतील सचिन ठोंबरे या तरूणाच्या बार्शीतील एका बँकेच्या खात्यावर पुणे येथील स्वारगेट शाखेतील कर्मचा-याच्या चुकीमुळे अचानक तीस हजार रूपये जमा होतात. तिस हजार रूपये खात्यावर येऊनही ठोंबरे यांनी आपली माणसिकता ढळु दिली नाही. बँक कर्मचा-यांनी त्यांच्याकडे संपर्क साधुन बँकेतील कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या कर्मचा-याकडुन झालेल्या चुकीच्या नोंदीमुळे आपल्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे सांगुन सदर रक्कम परत करण्यासंदर्भात विनंती करण्यात आली. ठोंबरे यांनीही क्षणाचाही विचार न करता व पैशावर मन न दाखवता सदर रक्कम परत करण्याचे मान्य करून सरळ बार्शी शाखेत जावुन सदर पैसै माझे नसुन खात्यामधुन ते तिस हजार रूपये काढुन घेण्यासंदर्भात लेखी पत्र देऊन टाकले तेव्हा त्या बँक कर्मचा-यांने सुटकेचा निश्वास सोडला. ठोंबरे या युवकाने मनात आणले असते तर तिस हजार रूपये घशात घालु शकत होता. एका सज्जन माणसाच्या खात्यावर रक्कम गेल्यामुळेच ती मला परत मिळाल्याचे सांगुन अशावेळी क्विचीतप्रसंगीच रक्कम परत मिळते अशी प्रतिक्रिया संबंधीत कर्मचा-याने व्यक्त केली. प्रामाणिकपणा दाखवल्याबदल ठोंबरे या युवकाचे सर्वस्थरांतुन अभिनंदन होत आहे.