बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : मूळ अशांतीचे कारण म्हणजे प्रत्येकामध्ये आदर्शांचा द्वंद सुरु आहे. आज आपण समाजाला ओळखत नाही, त्याचे कारण म्हणजे आपल्यासमोर रातोरात निर्माण होणार आदर्श समोर येत आहेत. या रातोरात तयार होणारांना आपण ओळखतही नव्हतो ते मोबाईलवर बोलत असल्याचे डिजीटल लावलेले तयार केलेले ब्रँडींगचे आमचे भाग्यविधाते झालेले असतात तर दुसरीकडे संघर्षातून निर्माण झालेले आदर्श असतात. तयार केले गेलेल्या आदर्शांकडे संसाधने आहेत पण विचार नाहीत असे मत राष्ट्रसंत भैय्यू महाराज यांनी व्यक्त केले.
    शुक्रवारी दि.२७ रोजी श्री सद्गुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्ट इंदौर आणि आरएसएम समाजसेवा संस्था बार्शी यांच्या वतीने रेणुका मंगल कार्यालयातील आयोजित अल्पभूधारक शेतकर्‍यांना मोफत बियाणे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सोनारीचे संजय महाराज पुजारी, सूर्योदय परिवाराचे राजाध्यक्ष नितिन जगताप, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक साईनाथ अभंगराव, महिला संघटक सौ. अस्मिता गायकवाड, धाराशिव उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील, उपजिल्हा प्रमुख श्रावन तात्या भंवर, संयोजक राजेंद्र मिरगणे, प्रा. संगमेश्‍वर भडुळे, भाजपा उपजिल्हा प्रमुख धनंजय जाधव, श्रीमती उज्वला जाधव, तालुका प्रमुख सौ. मंगल पाटील, आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना भैय्यू महाराज म्हणाले, भ्रष्टाचार दूर करण्यासाठी सेवा क्षेत्रातील ओझे कमी केल्याशिवाय भ्रष्टाचार दूर होणार नाही. मूळ कारण ५५ टक्के उत्पादन नोकरीतून मिळते. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये राष्ट्रप्रेम अथवा मानवतेची, संकल्पनेची भावना नसते, सेवा ही मजबूरी आहे म्हणून भ्रष्टाचार आहे, सेवा जर संकल्प झाला तर राष्ट्रधर्माला प्रमुख शिखरावर पोहोचवले. आज खरे आदर्श ओळखण्याची गरज आहे आणि बाजारवादी आदर्शाला बाजूला ठेवा, खरे संघर्षातून निर्माण झालेले गोरगरिबांचे कैवारी आदर्शांना कुठेतरी आहेत त्यांना स्विकारण्याचा विचार करा, एखाद्या व्यक्तीसमोर नतमस्तक होतांना त्याचे अनुकरण करतांना तुम्हाला नैराश्याचा सामना करायचा नसेल, नैराश्यातून जायचे नसेल तर त्यापुर्वी त्याने राष्ट्र समाज आणि मानवतेसाठी काय केले त्याचा विचार करा. नाहीतर त्याला आदर्श मानू नका, आदर्शाची फसवेगिरी आणि खोटे आदर्श यामुळेच भारतवर्षाची परिस्थिती झाली आहे. खरे आदर्श विनोभा भावे होऊन गेले त्यांनी लाखो हेक्टर जमीन गोरगरिबांसाठी भूदान आंदोलनाद्वारे मिळवून दिली. आदर्श मिळवतांना विचार करा, खरे आदर्श निवडा, आपल्या सद्गुणांना प्रखर करा, स्वाभिमानाने जगा, निर्णयक्षम व्हा, दुसर्‍यांच्या निर्णयाची वाट पाहू नका, अपेक्षा सोडून जे आहेत त्यांना स्वावलंबी, स्वाभिमानीचा संकल्प करा, संयमी, विनम्र, सहज रहा. अन्नाचे कण जमीनीवर पाहून हत्तीला खाली बसवून धुळीतून अन्नाचे कण गोळा करुन ते खात ते अन्नाचे महत्व पूर्वीच्या राजांना होते. आजचे राजे ३० टक्के अन्न गोडाऊनमध्ये सडवत आहेत आणि २० टक्के लोक अन्नावाचून मरत आहेत. अन्नावर प्रक्रिया करणारे उद्योग, शेतकर्‍यांची हलाकीची परिस्थिती आपण म्हणतो, अन्न जल देणारी शक्ती कोण आहे, त्याचा स्त्रोत अन अन्नाचा अमृत कण देणारा हा शेतकरी बंधू आहे. आज अन्नाची मूळ किंमत या भरतवर्षात होती म्हणून अन्नदाताची किंमत त्याच्यापेक्षाही जास्त होती. कारण तो अन्नाचे दान करायचा म्हणून शेतकरी बांधव भारतवर्षात सर्वश्रेष्ठ राहिलेले आहे. श्रीकृष्णाचे मोठे बंधू बलराम त्यांनीही शेती केली. देवानींही शेती केली, अन्नदाता आता का दारोदारी फिरतो आहे त्याचे कारण, खरं म्हटलं तर आपण अन्न जे उत्पादन करतो, त्याचा मोबदला मिळतो, जेवढा उत्पादनास खर्च लागतो त्यामानाने पैसे मिळायला लागले तर परिस्थिती सुधारता कामा नये, जर उपाशीपोटात अन्न घालण्याचे काम शेतकर्‍यांचे आहे तर शेतकर्‍यांना जीवंत ठेवण्यासाठी फुड सिक्युरिटी बिल येते त्याप्रमाणे शेतकर्‍यांसाठी क्रॉप कॉस्टिंग बिल पण येणे आवश्यक आहे.
     आपले सदगुण ओळखून स्वत:चे जीवन घडवा. त्यातूनच समाज आणि राष्ट्र घडेल. त्यामुळे खोटया आदर्शाच्या मागे धावून स्वत:ची फसवणूक करु नका. संवेदनशीलता आणि भावनाप्रधानता हि आधुनिक काळात नैराश्याने ग्रासलेल्या प्रत्येक माणसाची गरज आहे. त्यामुळे समाजासाठी त्याग करायला शिका असे आवाहन राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांनी आपल्या आर्शिवचनपर प्रवचनात केले. आज समाजामध्ये जर बघीतले तर सर्वात मोठा प्रश्‍न कोणता, परिवार, समाज, राष्ट्र, माणुसकी, माणुस या सर्व गोष्टींचा विचार केला तर त्या सगळ्यांकडे एक मोठा प्रश्‍न पुढे आहे तो म्हणजे नैराश्य, तरुणांना रोजगाराबद्दल, पुढची दिशा ठरविण्यासाठी नैराश्य, शेतकर्‍यांपासून मध्यमवर्गांपर्यंत सर्व वर्गांत नैराश्य दिसत आहे. शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडेच लागलेले असतात त्याचप्रमाणे भारतवर्षाचा प्रत्येक व्यक्ती नैराश्येत असतांनाही कुठेतरी आशेचा शोधात आहे. कुठेतरी मला समाधान मिळायला पाहिजे, प्रत्येक व्यक्ती आत्मिक, शारिरीक, मानसिक समाधानाच्या शोधात आहे. समाज एवढा बिखरलेला का आहे. सद्यस्थितीत कुठेही काहीच चांगले घडत नाही याचे कारण काय? शेवटी याच्या कारणाची ओळख करुन देणे अत्यंत महत्वाचे आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांची परिस्थिती हे जर सांगीतले तर प्रत्येक जण म्हणेल सर्व परिस्थितीची जाणीव आहे पण नैराश्य हे या परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे याचे आहे. परिस्थिती खूप वेगळा शब्द आहे मातीवर संस्कार केल्यानंतर सुंदर सुरई तयार करुन जीवनभर इतरांचे जीवन सुखकर करता येते. जीवनामध्ये कशीही परिस्थिती असो जर तुम्ही संयमीत रहाल तर तुमच्यामध्ये संघर्षाची ताकद निर्माण होईल, असेही त्‍यांनी बोलताना सां‍गितले.
 
Top