माजी केंद्रीय मंत्री (कै.) आनंदराव ऊर्फ दाजीसाहेब चव्हाण आणि काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या माजी खासदार (कै.) प्रेमलाबाई चव्हाण यांचा ८ जुलै रोजी स्मृतीदिन. काँग्रेस पक्षाची निष्ठा जोपासणा-या या दाम्पत्याने एक सुसंस्कृत व सहिष्णु राजकारणाचा वस्तूपाठ राज्याला घालून दिला आहे. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्या मात्यापित्यांनी घालून दिलेल्या या राजकारणाचा वारसा पुढे चालवित आहेत.
आनंदराव चव्हाण यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कुंभारगाव (ता. पाटण) येथे 21 ऑगस्ट 1914 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंभारगावातच झाले, माध्यमिक शिक्षण सातारा तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात झाले. एलएलबी नंतरची एलएलएम पदवी त्यांनी मुंबईत घेतली. कुंभारगावासारख्या डोंगराळ परिसरातील ग्रामीण भागातून एलएलएम झालेले आनंदराव हे पहिलेच विद्यार्थी. त्यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष असलेले बंडो गोपाला मुकादम यांनी आनंदरावांची कुसुर गावातून 51 बैल जुंपलेल्या बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढून सत्कार केला.
आपल्या मातीने केलेला गौरव आनंदरावांनी सार्थ ठरवतांना निष्णात कायदेपंडित म्हणून अल्पावधितच नावलौकिक मिळवला. 1945 मध्ये त्यांनी इंदूरच्या महाराजा होळकरांचे स्टेट सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. स्वातंत्र्यानंतर आनंदरावांनी कराडमध्ये आपली व्यावसायिक व राजकीय कारकीर्द सुरु केली. शेतकरी व श्रमिक कष्टकऱ्यांची असलेली बांधीलकी जोपासतांना त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. 1952 मध्ये त्यांनी पाटण विधानसभेची निवडणूक लढवली. 1954 त्यांची विधानपरिषदेवर निवड झाली. मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर त्यांनी खंबीर भूमिका घेतांना 1956 मध्ये विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनाम दिला. 1957 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत ते कराड मतदारसंघातून विजयी झाले.
आनंदरावांनी 1960 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर 1962 मध्ये कराड मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले. पंडित नेहरूंनीच त्यांच्या कर्तृत्वाची व क्षमतेची दखल घेऊन त्यांचा समावेश उपसंरक्षणमंत्री म्हणून आपल्या मंत्रिमंडळात केला. नेहरू-गांधी परिवाराशी आनंदरावांचा जुळलेला स्नेहबंध चव्हाण परिवाराच्या राजकारणाची दिशा निश्चित करणारा ठरला. या परिवाराच्या पाठीशी आनंदराव व त्यांचा परिवार ठाम उभा राहिला. 1969 मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनिमित्ताने पक्षात झालेल्या वादात आनंदरावांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाचे ठाम समर्थन केले. त्यानंतर इंदिराजींनी आपल्या मंत्रिमंडळात त्यांचा पेट्रोलियम रसायन राज्यमंत्री म्हणून समावेश केला. यानंतर त्यांनी 1973 मध्ये विधी व न्याय विभागाचे मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली. पक्ष नेतृत्वाने दर्शविलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. मात्र, 8 जुलै 1973 रोजी आनंदरावांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यमुनातीरी निगमबुध्द काठावर झालेल्या अत्यंसंस्कार प्रसंगी पंतप्रधान इंदिराजींसह सर्व नेतेमंडळींनी आनंदरावांना भावपूर्ण निरोप दिला.
आनंदराव काँग्रेसचे निष्ठावंत पाइक होते. एकदा घेतलेल्या भूमिकेवर ते ठाम राहिले. त्यांच्या या निष्ठेची गांधी परिवाराला जाण होती. आंनदरावांचे राहणीमान अतिशय साधे होते. रोज सकाळी न चुकता ते फिरायला जात. फिरुन आल्यानंतर बंगल्यातल्या व्हरांड्यात चहा घेत वर्तमानपत्र वाचतांना आनंदराव हमखास दृष्टीस पडत. महाराष्ट्रातून येणा-या मंडळींची ते अगत्याने चौकशी करत. आनंदरावांचे निवासस्थान अशा सा-या मंडळींचे हक्काचे घर होते.
आनंदरावांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याची धुरा प्रेमलाकाकीनी धिराने सांभाळली. आनंदरावांच्या हयातीत त्यांना खंबीरपणे साथ देणा-या प्रेमलाकाकी राजकीय आघाडीवर सक्रीय झाल्या. राजकारण त्यांना नवे नव्हतेच. आनंदरावांसोबतही त्या राजकीय, सामाजिक आघाडीवर कार्यरत होत्या. त्या मुळच्या इंदूर येथील सरदार घराण्यातून आलेल्या. त्यांचे लग्नापुर्वीचे नाव प्रेमलाबाई माधवराव जगदाळे होते. त्यांचा जन्म 2 जुलै 1916 रोजी झाला.
प्रेमलाकाकीनी आपले शिक्षण इंदूर, बडोदे व मुंबईतून पूर्ण केले. पदवीधर झाल्यानंतर त्यांचा विवाह 1942 मध्ये आनंदरावांशी झाला. लोकसभेवर निवडून आल्यानंतर आनंदराव 1957 पासून दिल्लीत सहपरिवार राहावयास आले. त्यावेळी प्रेमलाकाकीनी समाजकार्यात सक्रिय भाग घेतला. त्यावेळी महिलांसाठी फार पुढारलेले वातावरण नसतांनाही निवडणुकीच्या काळात त्या प्रचार सभांमध्ये भाषणे करीत. शिक्षणाची त्यांना विशेष आवड होती. त्यातून त्यांनी कराडमध्ये माँटेसरी स्कूल सुरु करून समाज कार्याला सुरुवात केली. या शाळेत सुरुवातीला 14 विद्यार्थी होते. त्यापैकी एक विद्यार्थी म्हणजे आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होय. कराडमध्ये कार्यरत असतांना त्या दिल्लीतील अनेक संस्थांमध्येही तितक्याच हिरीरीने कार्यरत होत्या. दिल्लीतील वनिता समाज, अखिल भारतीय महिला मंडळ, स्नेहवर्धक समाज, लेडीज दिल्ली क्लब, हॉस्पिटल वेल्फेअर सोसायटी, ऑल इंडिया वुमेन्स फेडरेशन, ऑल इंडिया डेफ अॅन्ड डंब स्कूल, ललित कला अॅकॅडमी, भारत स्काऊट गाइट दिल्लीतील नूतन मराठी हायर सेकंडरी स्कूल (ज्यामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले शिक्षण घेतले) अशा अनेक संस्थांच्या वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. काही संस्थांच्या स्थापनेत तर त्यांचा मोठा पुढाकार होता. या साऱ्यांसोबत त्यांना क्रिकेटची विशेष आवड होती. या आवडीतूनच त्यांनी ऑल इंडिया वूमेन्स क्रिकेट असोसिएशनचीपुणे येथे स्थापना केली.
सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यरत राहून ही प्रपंच नेटका करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. मात्र, प्रेमलाकाकींनी हा समतोल अतिशय व्यवस्थित सांभाळला. त्या अतिशय मेहनती होत्या. अविरत कार्यरत राहणे हीच त्यांची जीवनशैली होती. प्रत्येक काम आपल्याला जमायलाच हवे हा त्यांचा आग्रह असे. आपल्या मुली निरुपमा व विद्युलता तसेच पुतणे पंजाबराव चव्हाण यांची मुलगी नंदिता यांना शाळेत सोडण्या व आणण्यासाठी त्या स्वत: गाडी चालवत जात. पहाटे उठून समाज कार्यासंबंधात लिखाण व पत्र लेखन करीत. त्यांना बागबगीच्याची विशेष आवड होती. त्यातून त्यांनी दिल्लीतील बंगल्याच्या आवारात फळभाज्या व धान्यपिकांचीही लागवड केली होती. त्यांच्या बागेतील फुलकोबीची प्रशंसा तिथल्या वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली होती. याच बागेत 1972 मध्ये त्यांनी उत्कृष्ट दर्जाचे ज्वारीचे पिक घेतले.
आनंदरावांच्या निधनानंतर प्रेमलाकाकी कराड मतदारसंघातून लोकसभेवर बिनविरोध निवडून आल्या. इंदिराजींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसची महाराष्ट्रातील मुहूर्तमेढ रोवली गेली ती प्रेमलाकाकींच्या पुढाकाराने कराडमध्येच. हा सारा कालखंड काँग्रेससाठी विलक्षण अडचणीचा व प्रतिकूल होता. अशा कठीण काळात इंदिराजींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतांना प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली. आणीबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुकीत प्रेमलाकाकी महाराष्ट्रात सर्वाधिक तर देशातून दुस-या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आल्या. या सा-या राजकीय वाटचालीत इंदिराजींसोबतचा त्यांचा ऋणानुबंध अधिकच दृढ होत गेला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व करतांना त्यांनी सर्व ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन सामंजस्याने निर्णय घेतले. पक्षावर असलेल्या त्यांच्या मजबूत पकडीमुळे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सुसंघटीत राहिला.
प्रेमलाकाकींनी पक्षाच्या हितापुढे वैयक्तिक हित नेहमीच गौण मानले. त्यामुळेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या निष्ठेची कृतज्ञ जाण ठेवली. जबाबदारीच्या मोठ्या पदावर काम करतानाही कुटुंबाकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांच्या हृदयातला वात्सल्याचा झरा नेहमीच झुळझुळता राहिला. राजकारण आणि समाजकारणासोबतच प्रेमलाकाकी अतिशय रसिक व क्रीडाप्रेमी होत्या. कलावंतांच्या प्रशंसेत त्यांचा नेहमीच पुढाकार असे. 8 जुलै 2003 रोजी त्या अनंतात विलीन झाल्या. त्यांच्याच संस्कारित राजकारणाचा वसा घेऊन त्यांचे पुत्र पृथ्वीराज त्यापूर्वीच राजकारणात सक्रीय झालेहोते. आज एका ऐतिहासिक पर्वात आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीचे शिवधनुष्य जबाबदारीने ते पेलत आहेत. राजकारणातील सहिष्णुता व सुसंस्कृतता याचा दुर्मिळ आदर्श त्यांनी घालून दिला आहे.
चव्हाण परिवाराशी माझा 1968 पासून जवळचा ऋणानुबंध आहे. या परिवाराचा गेली 45 वर्षे एक घटकच म्हणून कार्यरत आहे. आनंदरावांसोबत प्रेमलाकाकींच्या सहवासात या परिवाराची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. प्रेमलाकाकींनीच मला स्वत:च्या शाळेत दाखल करून शिक्षण दिले. या परिवाराचे मोठेपणे मी जवळून अनुभवत आहे. आनंदराव व प्रेमलाकाकींनी माझी पुत्रवत काळजी घेतली, प्रेम दिले. त्यांच्या स्मृतीदिनी हा आठवणींना उजाळा देण्याचा एक प्रयत्न.

- अनंत आर. विभुते (चिकुर्डेकर)