बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- पावसाच्या आगमनाला झालेला उशीर तसेच हवामानाचा अंदाज घेत शेतकर्‍यांनी मशागत करुन ठेवलेल्या शेतात पेरण्या उशीरा करण्याचा निर्णय घेतल्याने शून्य टक्के पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी एस.व्ही जोशी यांनी दिली.
    बार्शी तालुक्‍यातील 138 गावांमध्‍ये खरीपाच्‍या 39 हजार क्षेत्रात घेण्‍यात येणा-या मुख्‍य पिकांपैकी तूर 13 हजार 780 हे., मका 2100, मूग 400, ऊस 11 हजार 870, सुर्यफूल 2500, कांदा 3000 हेक्‍टर यासह भाजीपाला इतर धान्‍यांची सरासरी पिके घेतली जातात. यंदाच्‍या मौसमात शेतक-यांनी कांद्याच्‍या लागवडीसाठी रोपवाटिकेत जवळपास 3 हजार हेक्‍टर लागवडीची रोपे तयार केली आहेत. परंपरागत नैसर्गिक नियमानुसार नक्षत्र कोरडी गेल्‍याने मुग, उडीद यांच्‍या पेरण्‍या होणार नाहीत. परंतु मागच्‍या वर्षी उशीरा झालेल्‍या पेरण्‍यांचा अनुभव पाहता शेतक-यांनी उशीरा पेरण्‍या पावसाचा अंदाज पाहून उशीराने पेरण्‍या कराव्‍या. हवामान खात्‍याने सांगितलेल्‍या 6 ते 9 तारखेस पावसाची शक्‍यता आहे. यामध्‍ये सोयाबीन व तूर या आंतरपिकाच्‍या पेरण्‍या केल्‍यास निश्चित पिकांसाठी निश्चित उपयुक्‍त ठरेल. पेरणी करताना 2 ओळी सोयाबीन व 1 ओळ तूर अशा पध्‍दतीने पेरणी केल्‍यास निश्चित फायदा होऊ शकतो.
 
Top