बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील सदगुरू प्रभाकर दादा बोधले महाराज भक्त मंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावणमासानिमित्त ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांची बोधवाणी प्रवचनमाला भगवंत मंदिरात सुरु होत आहे. रविवार (दि.२७ जुलै) पासून या प्रवचण मालेची सुरूवात होत असल्याची माहिती भगवंत देवस्थानचे सरपंच दादा बुडूख यांनी दिली.
मागील बारा वर्षापासून अखंडपणे सुरू असलेल्या प्रवचन मालेतून अनेक विषयांवर ऍड बोधले महाराज यांनी अत्यंत प्रभावीपणे प्रवचन देत पंचक्रोषीतील भक्तांना मंत्रमुग्ध केलेले आहे. यावर्षीच्या प्रवचनमालेत गोपीगीत या विषयावर विस्तृतपणे मार्गदर्शन होत आहे. भागवत ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या विरहात गोपीकांनी गायीलेले गीत म्हणजेच गोपीगीत होय. देव अन् भक्तांचे नाते स्पषट करत भक्तीचा मार्ग दाखविणा-या गोपीगीतामध्ये भक्ती शास्त्रातील सर्व भूमिकांचा विचार असून सामाजीक, व्यवहारिक दृष्टीने पाहिल्यास प्रेम, जिव्हाळा, वात्यल्य, आदी शब्दाची उकल यामध्ये असल्याची माहिती गुरवर्य बोधले महाराज यांनी दिली. विष्णू सहस्त्रनाम, दैवीसंपत्ती, चांगदेव पासष्ठी इत्यादी विषयांवर मागील बारा वर्षापासून अखंडपणे प्रवचनमाला सुरू आहे. दि.२७ जुलै पासून दररोज सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत भगवंत मंदीर येथे होणा-या प्रवचन मालेचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
