बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील शिवलिला महिला मंडळाच्या वतीने तालुक्यातील आदर्श मातांना मुख्याध्यापिका उमा बुचडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. बुधवारी दि.१६ रोजी जंगम समाज सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
        श्रीमती लक्ष्मीबाई चंद्रकांत कुगावकर, श्रीमती विमल गोरख घोलप, हब्बिब्बुनिसा सय्यद, श्रीमती शांताबाई भडंगे असे पुरस्कार विजेत्या आदर्श मातांची नावे आहेत. याप्रसंगी बोलतांना अध्यक्षा सुमन चंद्रशेखर म्हणाल्या, आईची इच्छाशक्तीनेच मुलांमध्ये जिद्द निर्माण होते. आदर्श मातांशिवाय आदर्श पाल्य निर्माण होत नाहीत, आदर्श पाल्यांशिवाय आदर्श देश घडू शकत नाही. मंडळाच्या वतीने यापूर्वी वाचन संस्कृती, धार्मिक कार्यक्रम, आदर्श बालकांसाठी कार्यशाळा, मठांची महती, मनोरंजन, भजन, पर्यावरण रक्षण आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत. मातृदिनानिमित्त आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या सदस्या शारदा पानगावकर, राधा थळपती, विजया स्वामी, सुचिता हिरेमठ, उमा स्वामी, मधुमती मठपती, शैलजा कानडे, प्रभुलिंग स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top