बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: राज्यभर सुरु असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनातील माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत बुथप्रमुखांचा मेळावा, जाहीर सभा बार्शीतील श्री.भगवंत मैदान येथे रविवारी दि.२० रोजी होत आहे. या सभेसाठी शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी जय्यत तयारी केली आहे.
मैदानाची पाहणी करण्यासाठी माजी आमदार राजेंद्र राऊत, शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर, अरुण बारबोले, बाबासाहेब कापसे, नगरसेवक महेदिमियॉं लांडगे, दिपक राऊत, विजय राऊत, अशोक बोकेफोडे, आण्णा शिंदे, सोमनाथ पिसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.
महाराष्ट्रात शिवशाही आणण्याससाठी संपूर्ण राज्यात त्यांचा झंजावाती दौरा सुरु असून सर्वत्र भगवे वातावरण निर्माण झाले आहे. लोकसभेत मताधिक्य मिळाले आहे, त्यापेक्षाही जास्त मताधिक्याने विधानसभेत भगवा फडकविण्याचे स्वप्न पक्षप्रमुखांनी पाहिले आहे. बुथ प्रमुखांना मार्गदर्शन व स्थानिक प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी त्यांनी राज्यभर जाहीर सभा, मेळावे यांद्वारे शिवसैनिकांना पाठबळ दिले आहे. बार्शी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसेनाप्रमुखांचे प्रेम असलेल्या बार्शीत राजेंद्र राऊत यांच्या प्रवेशानंतर नवचैतन्य निर्माण झाले आहे. सळसळत्या रक्ताचे मावळे शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दक्ष झाले आहेत. बार्शीतील श्री.भगवंत मैदानावर दोन चार दिवसांपूर्वी लहाना मुलांचे विविध पाळणे व जत्रेसारखे स्वरुप होते. मैदानाची परिस्थिती अत्यंत खराब होती, जागोजागी मातीचे ढिग, खड्डे, अस्वच्छता इत्यादींनी मैदानाची दुरावस्था झाली होती. शिवसेना पक्षाच्या वतीने दोनच दिवसांत मैदान अत्यंत देखण्या स्वरुपात सुसज्ज करण्यात आले आहे. बार्शीतील सर्व मोठ्या सभांचे आयोजन श्री भगवंत मैदान येथे करण्यात येते, इतर मध्यम सभांसाठी जुना गांधी पुतळा चौक तर किरकोळ सभा इतरत्र घेण्यात येतात. शिवसेनाप्रमुखांच्या प्रचंड मोठ्या जाहीर सभांनंतर ही रविवारची मोठी सभा होत आहे. 
 
Top