पांगरी (गणेश गोडसे) -: बार्शी तालुक्यात गाजत असलेल्या बोगस सोयाबिन बियाणे प्रकरणाची पालकमंत्री दिलिप सोपल यांनी दखल घेतली असुन ते रविवार दि. 20 जुलै रोजी पांगरी येथे आले असता, कृषी खात्याच्या अधिका-यांशी भ्रमनध्वनींवर संपर्क साधुन नुकसानग्रस्त सोयाबिन उत्पादक शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करावे, असे आदेश दिले. तालुक्यातुन तक्रारींचा ओघ वाढतच असुन शेतक-यांनी केलेल्या तक्रारीवरून सोयाबिन बियाणे तज्ञांसह पथकाने तालुक्यातील बाधीत क्षेत्राची पहाणी केली.
कृषी विदयापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. नजन साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी पी.डी.पाटील, बार्शी तालुक्याचे कृषी अधिकारी श्रीधर जोशी, महाबिजचे प्रतिनिधी बोबडे, बार्शी पंचायत समितीचे कृषी अधिकारी आण्णा साठे, मंडल कृषी अधिकारी बारवकर व तक्रारदार शेतकरी आदींच्या पथकाने शेतक-यांच्या शेतातील सोयाबिनच्या प्लॉटना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून जमीन व न उगवलेल्या सोयाबिनच्या बियानांचे नमुने घेण्यात आले. घटनास्थळावर जावुन उगवन न झालेल्या सोयाबिनचे पंचनामे करण्यात आले आहेत.
नुकसानग्रस्त शेतक-यांच्या शेतात संबंधित कंपन्याच्या प्रतिनिधींनी भेट दिल्यामुळे शेतक-यांच्या आशा पल्ल्वीत झाल्या आहेत. शेतक-यांच्या शेतामधुन घेतलेले नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच पुढील कार्यवाहीचे सोपस्कर पार पाडण्यात येणार आहे. कृषी खात्याचे अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी, तज्ञ आदींनी नुकसानग्रस्त शेतक-यांच्या प्लॉटला भेटी दिल्या तरी प्रत्यक्ष शेतक-यांच्या हातात नुकसानीच्या बदल्यात काय पडणार? पडणार का? का फक्त शेतक-यांची दिशाभुल करून त्यांची वरचेवरच बोळवण केली जाणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर्षी विक्री करूण कोटयावधी रूपयांचा गल्ला गोळा केलेल्या कंपन्यांना बियाणे उगवत नसल्याचा अंदाज अगोदरच होता. त्यामुळेच कंपन्यांनी सोयाबिनच्या बियानांच्या बॅगवर सर्टिफायडचे सेकंड लेबल लावण्याचे चानाक्षपणे टाळले असल्याची खळबळजनक माहिती समोर आली असुन कंपन्या एवढया खालच्या स्थरावर जावुन शेतक-यांना लुबाडुच कशा शकतात? अशी चर्चा शेतक-यांत सुरू आहे. पथक काय अहवाल देणार? शेतक-यांना नुकसानभरपाईसाठी मनातुन प्रयत्न होणार का? वरचेवर मलमपटीच केली जाणार? हे येणा-या काळातच समजणार आहे.
बार्शी तालुक्यात नामांकित अशा सोयाबिन बियाने उत्पादक कंपन्यांच्या महागडया बियानांची मोठया प्रमाणात पेरणी करण्यात आली होती. मात्र पेरणी करून बराच कालावधी उलटुन जाऊनही बियाणे उगवण्याचे नांव घेण्यास तयार नसुन सोयाबिन उत्पादक शेतक-यांचे धाबे दणाणले आहेत. सोयाबीन ऊत्पादक शेतक-यांना लाखो रूपयांचा फटका बसला आहे. सततच्या दुष्काळी परिस्थरतीमुळे बळीराजा अगोदरच हतबल झालेला आहे. त्यातच दुबार पेरणीचे संकट सोयाबिन ऊत्पादकांसमोर आहे. कंपन्यांनी किमान दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे तरी उपलब्ध करून द्यावे अशी आर्त हाक तालुक्यातील शेतकरी देत आहेत. सध्या दुबार पेरणीसाठी करायला सुध्द जमिनीत ओलं शिल्लक राहीलेली नसल्याचे चित्र आहे. सहज फसवता येणारा मनुष्यप्राणी म्हणुन भारतीय शेतक-यांकडे बघण्यांचा कंपन्यांचा उद्धेश आहे. कंपन्याचे प्रतिनिधी कांही ठराविक ठिकाणीच पाहणी करत असुन बार्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांना सरसकट मोफत बियाणे वाटप करून थोडासा तरी दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, अशी शेतक-यांची मागणी आहे.
निर्धावलेल्या व चानाक्ष कांही कंपन्यांनी कृषी खात्याला हाताशी धरून पेरणी केलेल्या क्षेत्रात पुरेशी ओल नव्हती. पेरणी कालावधीत सोयाबिनला उगवणक्षम वातावरण नव्हते. बियाणे खोलवर पडले असावे, आधुनिक यंत्राद्वारे पेरणी केली. पेरणीनंतर पाऊस झाला असावा, अशी विविध कारणे दाखवुन उगवण ही शेतक-यांच्याच चुकीमुळे झाल्याचे खापर त्यांच्यावरच फोडण्याच्या प्रयत्नात आहेत.