पांगरी (गणेश गोडसे) :- न्यायालयात साक्ष देण्‍याच्या कारणावरून तिघांनी मिळुन एकाला डोक्यात लाकडी काठीने मारून गंभिर जखमी केल्याची घटना कोरेगांव ता.बार्शी येथे रात्री आठ वाजन्याच्या सुमारास भगवानबाबा मंदिरासमोर घडली.
    आश्रूबा उर्फ श्रीनाथ चोरमले (वय 38, रा.कोरेगांव) असे काठीहल्यातील गंभिर जखमीचे नांव असुन रामचंद्र रामलिंग पाटील, कल्पेश रामचंद्र पाटील, सचिन संभाजी पाटील (तिघेही रा.कोरेगांव) अशी काठिहल्ला करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे असुन आरोपी फरार आहेत.
    जखमी आश्रुबा चोरमले यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, कांही वर्षांपुर्वी कोरेगांव येथे विनयभंगाची घटना घडलेली होती. त्या घटनेत जखमी चोरमले हे साक्षीदार आहेत. खटला निकालाच्या प्रतिक्षेत आहे. आरोपींनी खटल्यात साक्ष देऊ नको, असे म्हणुन त्यांच्या डोक्यात काठीने मारहान करून जखमी केले आहे. पांगरी पोलिसात तिघांविरूध्‍द मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top