तुळजापूर : तीर्थक्षत्र तुळजापूर न.प. च्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सौ. जयश्री विजय कंदले यांची बिनविरोध निवड झाली. सौ. कंदले यांच्या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करुन जल्लोष केला.
गुरुवारी निवडणूक पिठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची विशेष सभा बोलावण्यात आली. या वेळेस नगराध्यक्षपदासाठी सौ. कंदले यांचा एकच उमेदवारी अर्ज असल्यामुळे त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले. या वेळेस सहाय्यक निवडणूक अधिकारी राजु बुबणे, न. प. कर्मचारी वैभव पाठक, मावळत्या नगराध्यक्षा सौ. विद्याताई गंगणे यांनी पुष्पहार घालून निवडीचे स्वागत केले. यावेळेस गटनेते नारायण गवळी, उपनगराध्यक्ष गणेश कदम, नगरसेविका सौ. अर्चना गंगणे, अॅड. मंजुषा मगर, सौ. महंता साठे, सौ. रेखा परमेश्वर, स्वाती कदम, सौ. शशिकला वाघमारे, नगरसेवक पंडीत जगदाळे, दयानंद हिबारे, अजित परमेश्वर आदि उपस्थित होते.
सौ. कंदले यांच्या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यांनी फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष केला. सौ. कंदले यांची निवड झाल्याबद्दल दिलीप गंगणे, राजाभाऊ भोसले, विनोद गंगणे, अफसर शेख, अविनाश गंगणे, धनंजय गंगणे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक बाळासाहेब शिंदे, रा. काँ. चे शहराध्यक्ष आनंद कंदले, सचिन देशमुख, संतोष परमेश्वर, नगरसेवक नागनाथ भांजी, नगरसेविका डॉ. स्मिता लोंढे, विजय कंदले आदिंची उपस्थिती होती.
